देशभरामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या काळात अनेक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये अडकून पडले आहेत. महाराष्ट्रामध्येही उत्तर प्रदेश, बिहारबरोबरच इतर राज्यामधील हजारो कामगार अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता केदार शिंदे याने एक पोस्ट केली आहे. त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केदार शिंदेने सध्या आपापल्या राज्यात परतणाऱ्या कामगारांसंदर्भात एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ‘आता सर्व नोंदणी करून आपआपल्या गावाचा मार्ग धरतायत. @CMOMaharashtra आपल्याकडे त्यांचा data उपलब्ध झालाय. मराठी तरूणांना ते करीत असलेल्या कामांची माहिती करुन द्यावी! मराठी तरूणांना हीच संधी आहे. नंतर गळे काढून रडू नका.. त्यांनी काम हिसकावली!’ असे म्हटले आहे.
आजपर्यंत एकापेक्षा एक धमाल कलाकृती साकारणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेने पोस्टमध्ये बाहेरुन आलेले कामगार सध्या मुंबईसोडून आपापल्या घरी जाण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. ते गेल्यावर त्यांच्या कामाची माहिती मराठी तरुणांना द्यावी असे म्हणत पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यंमत्री यांना टॅग केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 7, 2020 10:21 pm