01 October 2020

News Flash

अभिनेत्रीने घेतला पॉर्न वेबसाइट्सचा धसका; यापुढे करणार नाही ‘हे’ काम

पॉर्न वेबसाईटवर 'या' अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाते.

‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ फेम किएरा नाइटली हॉलिवूड सिनेसृष्टीतील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. किएरा आपल्या जबरदस्त अभिनयासोबतच चित्रपटांमधील इंटिमेट सीन्समुळेही चर्चेत असते. न्यूड सीन्समुळे तिचे नाव पॉर्न वेबसाईटवर मोठ्या प्रमाणावर सर्च केले जाते. या प्रकारामुळे वैतागलेल्या किएराने आता यापुढे चित्रपटांमध्ये साधे किसिंग सीनही न करण्याचा निश्चय केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Keira Knightley ⌵ (@keiraknightleyofficialpage) on

काय म्हणाली नाईटली?

“मला चित्रपटांमधील न्यूड सीन्ससाठी ओळखले जाते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात रुपेरी पडद्यावर इंटिमेट सीन्स देताना मला काहीच वाटत नव्हते. परंतु आता माझं लग्न झालं आहे. मला दोन मुलं आहेत. परिणामी अशी दृश्य चित्रीत करताना मी अस्वस्थ होते. चित्रपटातील हे सीन जेव्हा माझी मुलं पाहातात, तेव्हा ते काय विचार करत असतील या विचारामुळे मी अस्वस्थ होते. तसेच माझे व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर देखील मोठ्या प्रमाणावर सर्च केले जातात. परिणामी आता मी अशी दृश्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे मी चित्रपटात साधे किंसिंग सीनही करताना १० वेळा विचार करेन.” असं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत किएरा नाइटली म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 3:03 pm

Web Title: keira knightley wont do nude scenes now that shes a mom mppg 94
Next Stories
1 तरुणीला वाचविण्यासाठी गेलेल्या ‘बिग बॉस 8’च्या स्पर्धकाला मारहाण
2 बिग बॉस फेम शिल्पा शिंदेने सिद्धार्थ शुक्लाला दिली मैदानात उतरण्याची धमकी
3 भांग पिऊन अभिनेत्रीने केला ‘नागिण डान्स’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
Just Now!
X