19 January 2021

News Flash

भोजपूरी सुपरस्टारची मुंबईच्या रस्त्यावर दादागिरी, व्हिडिओ व्हायरल

सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

भोजपुरी चित्रपटातील गाणी आणि अभिनयासाठी चर्चेत असणारा खेसारी लाल सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. खेसारी लालने मुंबईच्या रस्त्यावर एका बस चालकासोबत गैरवर्तन केल्यामुळे तो चर्चेत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.

‘बॉलिवूड पे चर्चा’ या यूट्यूब चॅनेलने त्यांच्या अकाऊंटवर खेसारी लालचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईमध्ये खेसारी लालच्या गाडीचा अपघात झाल्याचे दिसत आहे. या अपघातामध्ये कोणाली दुखापत झालेली नाही. पण खेसारी लालच्या गाडीचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे रागाच्या भरात खेसारी लालने बस चालकासोबत गैरवर्तन करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Video: एकेकाळी सेटवर ‘हा’ अभिनेता करायचा सर्वात जास्त फ्लर्ट, जया प्रदा यांनी सांगितले नाव

व्हिडीओमध्ये खेसारी लाल आणि बस ड्रायव्हर यांच्यामध्ये भांडण सुरु असल्याचे दिसत आहे. व्हिडिओत एक महिला खेसारी लालची चुक असल्याचे बोलताना दिसते. बस चालकाशी बोलताना खेसारी लालला राग येतो आणि तो त्याच्यासोबत गैरवर्तन करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 1:46 pm

Web Title: khesari lal yadav misbehave bus driver after his suv accident avb 95
Next Stories
1 पाठिंब्यासाठी शेतकऱ्यांनी रोखलं होतं जान्हवी कपूरच्या चित्रपटाचं शूटिंग
2 इस पतंग को ढिल दे….; मकर संक्रांतीवर तयार झालेली ही गाणी तुम्ही ऐकलीत का?
3 “क्रिकेटला तरी घराणेशाहीपासून दूर ठेवा”; बिग बींचं ते ट्विट पाहून नेटकरी संतापले
Just Now!
X