News Flash

माधुरीची भेट हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण – क्रिती सनॉन

या गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत यावर माझा विश्वासच बसत नाहीये

क्रिती सनॉन, माधुरी दीक्षित

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री क्रिती सनॉनला ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. या चित्रपटानंतर तिने ‘बरेली की बर्फी’,’स्त्री’, ‘दिलवाले’, ‘कलंक’ या चित्रपटांमध्ये काम करुन स्वत:ला सिद्ध केलं. त्यामुळेच क्रिती आजच्या घडीला लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. उत्कृष्ट अभिनय शैली आणि लूकमुळे आज ती अनेकांच्या मनावर राज्य करते.

आता सध्या ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटातून क्रिती झळकणार आहे. या चित्रपटात ती पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. नुकतंच चित्रपटाचे प्रमोशन करताना एका डान्स रिऍलिटी शो मध्ये क्रिती धक धक गर्ल माधुरी दीक्षितला भेटली. क्रिती माधुरीची खूप मोठी चाहती आहे. क्रितीने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून माधुरीसोबत काही फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. लहानपणी टीव्हीसमोर नाचताना मी त्यांचे अनुकरण करायचे. आज त्यांच्या बाजूला बसून, गप्पा मारून आणि त्यांच्यासोबत नाचून खूप विलक्षण वाटतंय. या गोष्टी प्रत्यक्षात घडत आहेत यावर माझा विश्वासच बसत नाहीये.”

‘अर्जुन पटियाला’ २६ जुलै २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 4:47 pm

Web Title: kriti sanon fan moment madhuri dixit djj 97
Next Stories
1 ‘ओ साकी साकी’च्या रिक्रिएट व्हर्जनवर नोराचा बेली डान्स पाहिलात का?
2 Video : ‘वर्ल्ड कप’ खेळायला गेला होतात की हनिमूनला? विराट व रोहितला राखी सावंतचा सवाल
3 या कारणासाठी अक्षय कुमारच्या मुलाला आवडत नाही क्रिकेट
Just Now!
X