News Flash

आलियाच्या लोकप्रियतेला ओहोटी?; ७५ टक्के प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यास दिला नकार

अभिनेत्याच्या पोलवर प्रेक्षकांनी दिला थक्क करणारा प्रतिसाद

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. यामध्ये सर्वाधिक टीका होतेय ती अभिनेत्री आलिया भट्टवर. दरम्यान अभिनेता कमाल आर. खान याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे. देशातील ७५ टक्के लोकांना यापुढे तिचे चित्रपट पाहायचे नाहीत, असा दावा त्याने केला आहे.

कमाल खान उर्फ केआरके याने काही दिवसांपूर्वी एक पोल केला होता. “यापुढे आलिया भट्टचे चित्रपट तुम्ही पाहाल का?” असा प्रश्न त्याने विचारला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ७५ टक्के लोकांनी यावर ‘नाही’ असं उत्तर दिलं. या पोलच्या आधारावर केआरकेने भारतातील केवळ १० टक्के लोक आलियाचे चित्रपट पाहतील असा दावा केला आहे.

आलिया भट्टवर सध्या सोशल मीडियाव्दारे प्रचंड टीका होत आहे. या टीकेमुळे तिची सोशल मीडियावरील लोकप्रियता कमालीची कमी झाली आहे. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कमाल खानचे हे ट्विट सध्या सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 8:22 pm

Web Title: krk poll 75 percent people dont watch alia bhatt movie mppg 94
Next Stories
1 ‘आग लगे बस्तीमें……’ म्हणत सोनाक्षी सिन्हाने डीअ‍ॅक्टीव्हेट केलं ट्विटर अकाऊंट
2 “बिंग ह्युमन संस्थेआड होतात आर्थिक गैरव्यवहार”; अभिनव कश्यपचा धक्कादायक आरोप
3 सलमानला पाठिंबा देत चाहत्यांचे तीन लाखांपेक्षा जास्त ट्विट
Just Now!
X