News Flash

सोशल मीडियावर अचानक का होतेय ‘बाहुबली’तल्या कुमार वर्माची चर्चा?

जपानच्या प्रेक्षकांवरही 'कुमार वर्मा'ने घातली भुरळ

अभिनेता सुब्बाराजू

बॉक्स ऑफीसवर तुफान गाजलेल्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीत छाप सोडली आहे. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं. त्यातील प्रत्येक पात्र आणि संवाद अनेकांना जसंच्या तसं लक्षात असतील. एकीकडे प्रभास आणि अनुष्का या मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी ‘बाहुबली २’मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली असतानाच छोटी भूमिका असलेल्या एका कलाकारानेही प्रेक्षकांची मनं जिंकली. ही भूमिका म्हणजे कुमार वर्माची. अभिनेता सुब्बाराजूने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. फक्त भारतातच नव्हे तर देशभरात सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटातील कुमार वर्माच्या भूमिकेचे आता चक्क सोशल मीडियावर इमोटिकॉन्स पाहायला मिळत आहेत.

सुब्बाराजूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘लाइन मॅसेंजर’वरील चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. जपानमधला हा चॅट विंडो असून त्यावर कुमार वर्माचे इमोटिकॉन्स पाहायला मिळत आहेत. ‘बाहुबली २’मधील कुमार वर्माच्या भूमिकेने प्रेक्षकांना चांगलंच हसवलं होतं. त्याच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं.

वाचा : नेहा धुपिया गरोदर? म्हणून केलं धावपळीत लग्न..

जपानप्रमाणेच चीनमध्येही ‘बाहुबली २’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या हॉलिवूड आणि ‘बाहुबली’ चित्रपटांचे मजेशीर मीम्स चीनमध्ये जोरदार व्हायरल होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 9:36 am

Web Title: kumar verma of baahubali 2 the conclusion is now an emoticon in japan
Next Stories
1 नेहा धुपिया गरोदर? म्हणून केलं धावपळीत लग्न..
2 शब्दाच्या पलिकडले : मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है…
3 पोलिओप्रमाणे जात हद्दपार होणार नाही का? : नागराज मंजुळे
Just Now!
X