News Flash

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१४’ पुरस्कारांवर ‘लय भारी’ची मोहर

वर्षांकाठी येणाऱ्या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार निवडण्याची संधी प्रेक्षकांना देणारा पुरस्कार सोहहळा म्हणजेच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’च्या या वर्षीच्या पारितोषिकांवर रितेश देशमुखच्या ‘लय

| December 28, 2014 04:36 am

वर्षांकाठी येणाऱ्या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार निवडण्याची संधी प्रेक्षकांना देणारा पुरस्कार सोहहळा म्हणजेच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’च्या या वर्षीच्या पारितोषिकांवर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटाने मोहर लावली.

यंदाचे वर्ष विविध आशयाच्या आणि कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या मराठी चित्रपटांनी गाजवले. त्यात ‘लय भारी’सारख्या बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडणाऱ्या चित्रपटांपासून ते मराठी पताका परदेशी फडकवणाऱ्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘यलो’सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. यांपैकी यावेळीच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरलेला चित्रपट होता, तो म्हणजे रितेश देशमुख याचा ‘लय भारी’. या चित्रपटाने सवरेकृष्ट चित्रपटापासून ते सवरेकृष्ट, नायक, संगीत, गायक, दिग्दर्शक अशा विविध पारितोषिकांवर आपली मोहर उमटवली. रितेश देसमुखला यंदाचा स्टाईल आयकॉन म्हणूनही गौरवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2014 4:36 am

Web Title: lai bhari awarded with gets maharashtracha favorite kon
टॅग : Lai Bhari
Next Stories
1 स्निक पिकः रिआन रितेश देशमुख
2 सलमानचा बर्थडे केक!
3 बॉलिवूड सुटीवर!
Just Now!
X