News Flash

Video : Show Must Go On ! यामीचा आत्मविश्वास कौतुकास्पद

यामीने डिझायनर गौरी आणि नैनिका यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता.

यामी गौतम

फॅशन जगतामध्ये अनन्य साधारण महत्व असणाऱ्या लॅक्मे फॅशन वीक २०१९ ला सुरुवात झाली. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री तब्बू आणि चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने या हजेरी लावली. तर दुसऱ्या दिवशी अभिनेत्री यामी गौतमने रॅम्प वॉक करुन साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र रॅम्पवर चालत असताना यामीचा पाय ड्रेसमध्ये अडकला आणि ती पडण्यापासून थोडक्यात बचावली. सध्या यामीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

‘लॅक्मे फॅशन वीक २०१९’ मध्ये यामीने डिझायनर गौरी आणि नैनिका यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये यामीने मंचावर ग्रॅण्ड एण्ट्री केली. यावेळी चालत असताना अचानकपणे ड्रेसमध्ये पाय अडकून यामी अडखळली. मात्र यामीने तात्काळ तोल सांभाळून त्याच आत्मविश्वासाने हा रॅम्प वॉक पूर्ण केला. यामीने दाखविलेल्या याच आत्मविश्वासाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, यामीने यावेळी लाईट मेकअप, न्यूड लिपस्टिक, स्मोकी आईज असा मेकअप केला होता. त्यामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं. यामी सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक समजली जात आहे. यामीने आतापर्यंत ‘काबील’, ‘सनम रे’, ‘जुनूनियात’,‘विकी डोनर’,‘बदलापूर’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकताच यामीचा ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या चित्रपटातील तिचा अभिनयही वाखाणण्याजोगा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 3:10 pm

Web Title: lakme fashion week 2019 yami gautam trips while walking ramp
Next Stories
1 ‘लव्ह आज कल २’ मधून साराचा काढता पाय?
2 हॉलिवूडपटात माँ आनंद शीला यांची भूमिका साकारणार ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री
3 विराट व अनुष्कामध्ये आहेत ही साम्यस्थळं!
Just Now!
X