07 June 2020

News Flash

भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांचा ‘बाहुबली’ अवतार, शेअर केला भन्नाट व्हिडीओ

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्याच्या एक दिवस आधी भन्नाट व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. भारतातील माझ्या सर्वांत चांगल्या मित्रांना भेटण्यासाठी फार उत्सुक आहे, असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते ‘बाहुबली’च्या अवतारात पाहायला मिळत आहेत. ‘बाहुबली’ या प्रसिद्ध चित्रपटातील एका गाण्याचा मॉर्फ केलेला हा व्हिडीओ आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे.

धार्मिक स्वातंत्र्यावर करणार चर्चा

या दौऱ्यादरम्यान ट्रम्प पंतप्रधान मोदींशी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) च्या मुद्यांसह धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात

जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला दिल्ली प्रवासादरम्यान याच सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीत जेवण वाढले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2020 11:19 am

Web Title: look forward to being with great friends in india trump tweets with morphed baahubali video ssv 92
Next Stories
1 ‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकवरुन दिग्दर्शकावर भडकली सोनम कपूर
2 गाव तेथे चित्रपटगृह!
3 लुकलूकते काही : मधुबालावरचा चरित्रपट डब्यात?
Just Now!
X