07 March 2021

News Flash

अमेय-निपुणला कंटाळून महेश मांजरेकरांनी पळ काढला !

अमेय-निपुणने चक्क त्यांच्या तीन चित्रपटांसाठी मांजरेकरांना साइन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्व प्रेक्षकांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी कोणत्या भारदस्त व्यक्तीसमोर विनवणी करत आहेत? अखेर या प्रश्नावरचा पडदा आता उघडला गेला आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी  ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या वेब सिरीजच्या आठव्या एपिसोडला उपस्थिती लावली होती. मांजरेकरांचा चित्रपटसृष्टीत बराच दबदबा आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला सगळेच घाबरून असतात त्याप्रमाणे अमेय आणि निपुणही त्यांना यात घाबरलेले दिसले. विशेष म्हणजे या एपिसोडच्या निमित्ताने महेश मांजरेकरांचा नवा लूक सर्वांना पाहायला मिळत आहे. साइड हेअर कट, पोनी आणि फ्रेंच दाढी अशा हटके लूकमध्ये मांजरेकर पाहावयास मिळतात. मांजरेकरांचा आताचा हा लूक त्यांचा जवळचा मित्र संजय दत्त याच्या लूकशी मिळताजुळता आहे.
खरंतर मांजरेकरांना त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर उशिरा जाण्याची सवय आहे. त्यामुळे अमेय-निपुणलाही तसेच वाटले की हे काही वेळेत येणार नाही. पण मांजरेकरांनी या दोघांनाही आश्चर्याचा धक्का दिला. मांजरेकर या दोघांच्या आधी सेटवर पोहचल्याने त्यांची चांगलीच धांदल उडालेली या व्हिडिओत पाहावयास मिळते. यावेळी त्यांच्या चित्रपटांविषयीही बरीच चर्चा करण्यात आली. इतकेच नाही तर इतरांना आपल्या चित्रपटात काम देणा-या मांजरेकरांना अमेय-निपुणने चक्क त्यांच्या तीन चित्रपटांसाठी साइन केले आहे. मांजरेकर या चित्रपटात केवळ कामच करणार नाहीत तर त्याची निर्मिती करतील असेही या दोघांनी जाहीर केले. त्यानंतर मांजरेकरांनीही आपण थोड्याच वेळात स्क्रिप्ट वाचायला घेऊया असे सांगत तिथून पळ काढला. दरम्यान, या तिघांमध्ये नक्की काय धम्माल झाली आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 3:06 pm

Web Title: mahesh manjrekar in casting couch with amey nipun
Next Stories
1 VIDEO: ‘क्वांटिको २’च्या टीझरमध्ये प्रियांका चोप्राचा हॉट लूक
2 स्पृहा जोशीचे पहिले रौप्य पदक
3 ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला होता हा आघाडीचा अभिनेता!
Just Now!
X