‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचली. यामागचं कारण म्हणजे मालिकेचं हटके कथानक. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची वय विसरायला लावणारी ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. मालिकेत नुकताच विक्रांत आणि इशाचा विवाहसोहळा पार पडला. पण येत्या काही दिवसांत मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

विक्रांत आणि इशाच्या लग्नानंतर आता कथा नेमकं काय वळण घेणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. नुकताच झी मराठीने मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेत येणाऱ्या नव्या वळणाची झलक पाहायला मिळत आहे. विक्रांतच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे. कारण चांगुलपणाच्या मुखवट्याआड लपलेल्या विक्रांत सरंजामेंचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

वाचा : ‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा-विक्रमच्या अजब लग्नाची गजब कहाणी

इशासोबत लग्न का केलं यामागचं खरं कारण विक्रांत सांगणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता हे कथानक पाहायला मिळणार आहे.
सुबोध भावे, गायत्री दातार यांची ‘तुला पाहते रे’ मालिका टीआरपी रेटिंग्जमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. शिवाय, प्रेक्षकही मालिकेला भरभरून प्रतिसाद देत आहेत.