News Flash

सनीच्या ‘तेरा इंतजार’ टीमने जिंकली ‘बार्बी’ कंपनीविरोधातील याचिका

बार्बीला सनीशी जोडले गेल्याने बार्बीच्या ब्रॅण्डसाठी ते अपमानजनक आहे.

सनी लिओनी

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी आणि अभिनेता अरबाज खान यांचा आगामी ‘तेरा इंतजार’ चित्रपट काही दिवसांपूर्वी कायद्याच्या कचाट्यात सापडला होता. चित्रपटात सनीचे एक खास गाणे आहे. गाण्यात ‘आय अॅम सेक्सी बार्बी डॉल’ असे बोल असल्यामुळे बार्बी डॉल्सची निर्मिती करणाऱ्या मॅटल इन्क कंपनीला ते काही रुचले नाही. त्यामुळे मॅटल इन्कने त्यांची परवानगी न घेता गाण्यात बार्बीचा उल्लेख करणाऱ्या ‘तेरा इंतजार’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.

वाचा : जॉनी लिव्हर यांना आजही या गोष्टीचे दुःख..

मॅटल इन्कने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या वृत्तानुसार, लहान मुली खेळण्यात बार्बी डॉल वापरतात. सनी ही पॉर्न इंडस्ट्रीतून आलेली आहे. तिचा भूतकाळ पाहता तिने बार्बी शब्दाचा उल्लेख करणे योग्य दिसत नाही. बार्बीला सनीशी जोडले गेल्याने बार्बीच्या ब्रॅण्डसाठी ते अपमानजनक आहे. त्यामुळे चित्रपटातून हे गाणे वगळण्यात यावे.

Inside Photo वाचा : झहीर-सागरिकाच्या ‘वेडिंग रिसेप्शन’ला विराट-अनुष्काची हजेरी

दरम्यान, नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, न्यायलयाने ‘तेरा इंतजार’च्या टीमला बार्बी प्रकरणात दिलासा दिला आहे. मॅटल इन्कने निर्मात्यांवर केलेले आरोप चुकीचा असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यामुळे निर्मात्यांविरोधात यापुढे कोणतीही तक्रार करू नये असेही न्यायालयाने मॅटल इन्कला सांगितले. त्याचसोबत आता युट्यूबवर ‘सेक्सी बार्बी गर्ल’ ऐवजी गाण्याचे शीर्षक ‘सेक्सी बेबी गर्ल’ करण्यात आले आहे. शब्बीर अहमदने लिहिलेलं हे गाणे राज आशूने संगीतबद्ध केले आहे. तर स्वाती शर्मा आणि लिल गोलू यांनी गाण्याला आवाज दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 11:31 am

Web Title: makers of sunny leones tera intezaar win the legal case against barbie company
Next Stories
1 जॉनी लिव्हर यांना आजही या गोष्टीचे दुःख..
2 एकत्र दारु प्यायला बसल्यावर काम मिळतं- राखी सावंत
3 Sagarika Ghatge And Zaheer Khan’s Wedding Reception : झहीर-सागरिकाच्या ‘वेडिंग रिसेप्शन’ला विराट-अनुष्काची हजेरी
Just Now!
X