X

घटस्फोटानंतर मलायका म्हणते, आता मी शांततापूर्ण जीवन जगतेय

अरबाज खान- मलायका अरोरा ही बॉलिवूडमधली जोडी अठरा वर्षांच्या संसारानंतर गेल्यावर्षी विभक्त झाली.

अठरा वर्षांच्या सहजीवनानंतर अरबाज खान- मलायका अरोरा ही बॉलिवूडमधली जोडी गेल्यावर्षी विभक्त झाली. घटस्फोटानंतरही मलायकानं खान कुटुंबाशी संबध तोडले नाही. या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी मैत्री मात्र अद्यापही कायम आहे. घटस्फोटानंतर मलायकाचं नाव अर्जून कपूरशी तर अरबाजचं नाव जॉर्जिया अँड्रीयानीशी जोडलं गेलं.

दोघांच्याही घटस्फोटामागची अनेक कारणं चर्चेत आली मात्र सोशल मीडियावर मात्र ती कारणं म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं सांगत या दोघांनी प्रकरण शांत केलं. नुकताच एका चॅट शोमध्ये मलायकानं घटस्फोटानंतरच्या तिच्या नव्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. आता मी पूर्वीपेक्षाही खूप शांततापूर्ण जीवन जगत आहे. माझ्या आजूबाजूलाही केवळ शांतता नांदत आहे असं मलायका म्हणाली आहे.

मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज जॉर्जिया अँड्रीयाना हिला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. तर काही दिवसांपूर्वी मलायकानं एका फॅशन शोला अर्जून कपूरसोबत उपस्थिती लावली होती.