अभिनेत्री मलायका अरोरा कायमच प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. यात तिच्या फिटनेसपासून ते तिच्या पर्सनल लाइफपर्यत अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सध्या मलायका आणि तिच्या मुलाचा अरहानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अरहानसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ फिल्मफेअरने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका क्रिकेट खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे मलायका तिच्या करिअरसोबतच तिच्या कुटुंबालादेखील तितकाच वेळ देत असल्याचं यातून दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Filmfare (@filmfare)

दरम्यान, मलायका अरोरा हे नाव कलाविश्वासाठी किंवा चाहत्यांसाठी नवीन राहिलेलं नाही. अलिकडेच ती इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत झळकली होती. या शोच्या महाअंतिम सोहळ्यात तिने मुन्नी बदनाम या गाण्यावर डान्स करत पुन्हा अनेकांच्या काळजावर घाव घातल्याचं दिसून आलं