28 September 2020

News Flash

मल्लिकाच्या ‘त्या’ मादक कृतीमुळे सलमानही लाजला

मल्लिका शेरावत बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

मल्लिका शेरावत बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने अलिकडेच सलमान खानच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. मात्र या शोमध्ये आल्यावर तिने असे काही कृत्य केले की ज्यामुळे सलमानही तिच्यासमोर उभं राहाण्यास लाजू लागला.

‘बिग बॉस’ हिंदीच्या १३ व्या पर्वात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मि देसाई या दोन स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणे सुरु आहेत. दरम्यान बिग बॉसमध्ये तापलेले वातावरण थोडेसे थंड करण्यासाठी अभिनेत्री मल्लिका शेरावतला विशेष पाहुणी म्हणून बोलवण्यात आले. मात्र शोमध्ये आल्यावर तिने असे काही केले ज्यामुळे सलमानही लाजला.

मल्लिकानं असं केलं तरी काय?

तिने सलमानला मी किती हॉट आहे? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताना तिने अत्यंत मादक हावभाव केले. त्यावेळी तिने सलमानचा हात देखील पकडला होता. या सर्व प्रकारामुळे सलमान थोडासा गोंधळला. त्यानंतर त्याने थोडेसे लाजत तिचा हात दूर केला. लाजणाऱ्या सलमानला पाहून प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला. हा व्हिडीओ सोनी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 4:30 pm

Web Title: mallika sherawat in bigg boss mppg 94
Next Stories
1 K.G.F 2: पुन्हा साम्राज्य निर्माण करणं सोप्प नाही, संजय दत्तनं शेअर केला पहिला पोस्टर
2 Video: उदित नारायण यांच्या मुलाने घातली नेहा कक्करला लग्नाची मागणी
3 ‘बॉण्ड गर्ल’चं निधन, ‘त्या’ न्यूड सीनमुळे झाली होती प्रसिद्ध
Just Now!
X