News Flash

‘गॉन केस’; कुशलचा नवा लूक पाहून चाहते हैराण

कुशलचा नवा लूक पाहिलात का?

देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे सध्या लॉकडाउन सुरु आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे सहाजिकचं मालिका, चित्रपट यांचंही चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सारे सेलिब्रिटी घरात राहून त्यांच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. सोबतच त्यांचे नवनवीन छंद जोपासत आहेत. यामध्येच ‘चला हवा येऊ द्या’फेम कुशल बद्रिकेदेखील या दिवसांमध्ये सुट्टीचा आनंद लूटत आहे. बऱ्याच दिवसानंतर इतकी लांब सुट्टी मिळाल्यामुळे तो या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. यामध्येच त्याने आता एक नवीन लूक केला असून सध्या त्याच्या या लूकची चर्चा होत आहे.

कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अलिकडेच त्याने कुटुंबासोबत ‘गो करोनिया’ हे गाणं सादर केलं होतं. हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्याने एक भारुडही सादर केलं होतं. या सगळ्यानंतर आता त्याने एक नवीन लूक केला आहे. त्याने त्याचे केस कापले असून टक्कल केलं आहे त्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा होत आहे.

“माझ्या घरचे नेहमी म्हणायचे, मी म्हणजे गेलेली केस आहे !! (एकदाच माझ डोकं सटकलं आता डोक्यावरून काहीही सटकतं.) लॉकडाऊन हेअरकट,” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, लॉकडाउन आहे त्यात उन्हाळादेखील त्यामुळे अनेक मुलांनी केस कापल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्या तरुणांमध्ये हा ट्रेण्डचं झाला आहे. या ट्रेण्डमध्ये कुशल बद्रिकेनेदेखील त्याचे केस कापले आहेत. त्याने चक्क टक्कल केलं आहे. हा फोटो शेअर करुन त्याने एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 4:26 pm

Web Title: marathi actor kushal badrike lockdown haircut ssj 93
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये बाहेर बिनधास्त फिरतेय ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री
2 थेट अंतराळात करणार स्टंटबाजी; अभिनेत्याची नासासोबत तयारी सुरु
3 … म्हणून एकेकाळी मुंबईच्या अंडर-१९ संघातील खेळाडू बनला श्री कृष्णमधील बलराम
Just Now!
X