‘काहे दिया परदेस’ मालिकेतून मराठी प्रेक्षकांची पसंती मिळवलेला अभिनेता ऋषी सक्सेना एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला यतोय. साधा सरळ अशी ओळख असलेला ऋषी सक्सेना ‘गुडबॉय’ या वेब सीरिजमधून  एका हटके अंदाजात  झळकणार आहे. एक कॉमेडी लव्हस्टोरी या वेब सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

लव्ह स्टोरीतला एक वेगळाच ट्विस्ट या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. ऋषी सक्सेना सोबतच खुशबू तावडे, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहनी, विनय येडेकर या कलाकारांची मुख्य भूमिका वेब सीरिजमध्ये पाहायला मिळेल. कॅफे मराठीच्या नितीन रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन यांनी या वेब सीरिजची निर्मिती केलीय. तीन मार्चपासून हंगामा प्ले, एमएक्स प्लेअर आणि इतर विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या वेब सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. या ट्रेलरला चागत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

‘गुड बॉय’ वेब सीरिजमध्ये ऋषी सक्सेना प्रणव ही भूमिका साकारताना दिसणार आहे. वेगवेगळ्या मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी प्रणवला करावा लागणारा ड्रामा; यातून त्याची झालेली फजिती ही सारी धमाल या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. तर अभिनेत्री खुशबू तावडे एका मोठ्या ब्रेकनंतर ‘गुड बॉय’ वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येतेय.

एकंदर मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात खेचणारा प्रणव. त्यानंतर त्याच्या आयुष्यात आलेली एक मुलगी आणि यासगळ्यातून झालेला गोंधळ, टेंशंन आणि तमाशा या वेब सीरिजमधून पाहायला मिळणार आहे.