मराठी चित्रपटसृष्टीची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढत असून या सृष्टीतील प्रत्येक कलाकाराचा एक स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे या चाहत्यांच्या गराड्यामध्ये टिकून राहण्यासाठी आणि स्वत:च अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. यामध्येच चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी अभिनेता विजय पाटकर यांनी नवी युक्ती लढविली असून त्यांनी एक नवं अॅप लॉन्च केलं आहे.

विजय पाटकर यांनी किनशीप हब हे अॅपचं लॉन्च केलं असून या अॅपच्या माध्यमातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. त्यामुळे आता केवळ एका क्लिकवर चाहत्यांना विजय यांच्याविषयी आणि त्यांच्या चित्रपटाविषयीची माहिती सहज मिळविता येणार आहे.या अॅपचे नुकतेच एका छोटेखानी समारंभात अनावरण करण्यात आले.

vaishali darekar s campaign, bjp mla ganpat gaikwad wife, bjp mla ganpat gaikwad wife to media,
मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती
Who will give the manifesto of health guarantee for the elderly
वृद्धांच्या आरोग्याच्या हमीचा ‘जाहीरनामा’ कोण देणार?
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?

दरम्यान, किनशिप हब या अॅपद्वारे विजय पाटकरांसोबत थेट संवाद साधण्याची संधीदेखील प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अॅप विजय पाटकर यांच्या अॅडमीन नियंत्रणाखाली प्रसारित होत असल्याकारणामुळे, यात ट्रोलर्सना जागा नाही. थोडक्यात काय तर, या अॅपचा आस्वाद विजय पाटकर यांच्या खऱ्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना घेता येणार आहे.