26 September 2020

News Flash

लॉकडाउनमध्ये सोशल मीडियापासून लांब राहण्याचं तेजश्रीनं सांगितलं कारण

नेमकं काय झालं असेल तेजश्रीला

लॉकडाउन असल्यामुळे देशात सारं काही बंद आहे. यात सहाजिकचं मालिका, चित्रपट यांचंही चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिका पाहता येत नाहीयेत. त्यामुळे प्रेक्षक मालिकांसोबत त्यातील कलाकारांनाही मिस करत आहेत. यामध्येच अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील कलाकारांनाही चाहते फार मिस करत आहेत. त्यामुळे सध्या शुभ्रा अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान घरी राहून नक्की काय करत असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

‘होणार सून मी या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या अन्य कलाकारांप्रमाणेच घरी आहे. या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. मात्र तेजश्री सोशल मीडियावरही सक्रीय नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या ती कुठे गायब झाली आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र या मागचं कारण तेजश्रीने स्वत: दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

RELAX. It is already yours. It was written in the stars before you were born #HappyLife @keerath__

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

“सध्या मी सोशल मीडियापासून लांब असण्यामागे एक खास कारण आहे. मला मुळात सोशल मीडियावर राहून उगाच वेळ वाया घालवायला आवडत नाही. एरवी वेळ नसल्यामुळे अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. त्या गोष्टी मी या काळात करत आहे. मला ती संधी मिळाली आहे आणि मला सोशल मीडियावर लाइव्ह वगैरे येणं आवडत नाही. एकदा हा लॉकडाउन आणि करोनाचं संकट दूर झालं की या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. त्यामुळे याकाळात मी सोशल मीडियापासून लांब आहे”, असं तेजश्री म्हणाली.

दरम्यान, तेजश्री छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गदेखील तितकाच मोठा आहे. याच कारणास्तवर तेजश्रीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 4:23 pm

Web Title: marathi actress tejashree pradhan avoid social media ssj 93
Next Stories
1 प्रेक्षकांनी मानले ‘रामायण’चे आभार ; जाणून घ्या कारण
2 Video : अखेर इरफान खानवर विनोद करणाऱ्या पाकिस्तानी सूत्रसंचालकाने मागितली माफी
3 Video : ‘तारक मेहता’ मधील ‘बापूजीं’चे भांडी घासण्यावरुन भांडण, पाहा मजेशीर व्हिडीओ
Just Now!
X