News Flash

विनोदी अंगाने सामाजिक संदेश देणारं ‘सनी तूच माझ्या मनी’ नाटक

लग्न झाले की नवदाम्पत्य सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागतात

लैंगिक शिक्षण ही सध्या काळाची गरज आहे. हल्ली मनोरंजनाच्या माध्यमातून अनेक नाटक, चित्रपटाद्वारे या विषयावर भाष्य करण्यात आलं असले तरी त्याची अधिकाधिक जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. रमेश वारंग लिखित आणि दिग्दर्शित “सनी तूच माझ्या मनी” हे विनोदी नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचं नाव जरी हटके असलं तरीदेखील त्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या नाटकात सध्या चर्चेत असलेला चेहरा “अलबत्त्या गलबत्त्या” फेम सनीभूषण मुणगेकर प्रमुख भूमिकेत असून सोबत सायली लिमये, केतकी खोत, दिपाली अथनिकर, करन पवार, पवन गव्हाल, मोहित खरारे, समृद्धी नाईक आणि रमेश वारंग या कलाकारांनी त्याला साथ दिली आहे.

भारतात सध्या घटस्फोटाचे प्रमाण खुप वाढू लागले आहे. काही नवदाम्पत्याचे घटस्फोट मधुचंद्राच्या दुसर्‍या दिवशी झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे मूळ कारण म्हणजे सेक्सबद्दलची अज्ञानता आणि असमजूतपणा. लग्न झाले की नवदाम्पत्य सुखी संसाराची स्वप्ने पाहू लागतात. एकमेकांना समजून घेणे, त्यांचा स्वभाव, त्यांचे राहणीमान, त्यांच्या कुटुंबीयांशी मिळून मिसळून वागणे हे सर्व पर्यायाने आलेच. पण बहुतांश वेळा असं काही घडत नाही. मधुचंद्राच्या रात्री फक्त सेक्सला प्राधान्य न देता एकमेकांना समजून घेणे, आपल्या आवडी निवडीत सहभागी होणे, एकमेकांच्या गरजा ओळखणे, याकडे लक्ष केंद्रीत केले की घटस्फोटाची प्रकरणे खूपच कमी होतील. हेच “सनी तूच माझ्या मनी” या नाटकात मुद्देसूद दाखवण्याचा लेखक – दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे.

वाचा : डोळ्याचे पारणं फेडणारं परिणीतीचं सौंदर्य

 घटस्फोट का होतो ? तो कसा टाळता येवू शकतो ? याची माहिती धमाल विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना या नाटकात पहायला मिळणार आहे. संपूर्णपणे विनोदी असणार्‍या या नाटकाचा शेवट चटका लावणारा असून प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 3:18 pm

Web Title: marathi drama sunny tuch majha mani ssj 93
Next Stories
1 ‘मी मुसलमान, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं…’; शाहरुखने सांगितला मुलांचा खरा धर्म
2 ‘ऐका दाजीबा’मधील ही मुलगी आता कशी दिसते?
3 रितेश-जेनेलियाच्या मुलांनी जिंकलं नेटकऱ्यांचं मन; पाहा व्हिडीओ
Just Now!
X