पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला होता. तब्बल ३ दशकांचा संघर्ष, सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला निर्णय यानंतर राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. या निमीत्ताने अयोध्या शहर सजवण्यात आलं होतं. इतकच नव्हे तर देशभरात भाजपा कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी आपला आनंद साजरा केला. बाबरी मशिद-राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशाच्या राजकारणाला एक मोठी कलाटणी मिळाली. राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर अनेकांनी याबद्दल आनंद साजरा केला.

अवश्य पाहा – राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

मराठी सिनेसृष्टीत लेखक म्हणून काम करणाऱ्या क्षितीज पटवर्धनने यानिमीत्ताने आपलं महत्वाचं मत मांडलं आहे. जय श्रीराम म्हटलं म्हणून तुम्ही धर्मांध नसत आणि म्हटलं नाही म्हणून तुम्ही देशद्रोही नसता. एकत्र नांदणाऱ्या सर्वसमावेशकतेमुळे आपला देश मोठा आहे. कोणत्याही प्रकारची कट्टरता टाळणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मत क्षितीजने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये व्यक्त केलंय.

क्षितीजच्या या पोस्टचं अनेकांनी समर्थन केलं आहे. मराठी सिने आणि नाट्य सृष्टीत क्षितीज पटवर्धनने आतापर्यंत अनेक महत्वाची कामं केली आहेत. नवा गडी नवं राज्य, सगळे उभे आहेत यासारखी नाटकं तर क्लासमेट, डबल सीट, टाईमपास २ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांत क्षितीजने काम केलंय.

अवश्य वाचा – राम मंदिर भूमिपूजन : द्वेष पसरवणाऱ्यांना थारा देऊ नका, मोहम्मद कैफचं आवाहन