News Flash

‘ती सध्या काय करते’चा दुसरा टिझर प्रदर्शित

अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर यांच्यातली प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे

सतीश राजवाडेचा आगामी सिनेमा 'ती सध्या काय करते'

काही महिन्यांपूर्वी सतीश राजवाडेचा आगामी सिनेमा ‘ती सध्या काय करते’चा दुसरा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा आता ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेरसिकांना एक वेगळे कथानक असलेला सिनेमा लवकरच पाहायला मिळणार आहे.

या सिनेमाच्या टिझरमध्ये एक फ्रेश चेहरा दिसत आहे. अभिनय बेर्डे या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा आपल्या आई- वडिलांचा वारसा पुढे न्यायला सज्ज झाला आहे. या सिनेमात तो अंकुश चौधरीची किशोरवयीन भूमिका साकारत आहे. तर आर्या आंबेकर ही तेजश्री प्रधानची किशोरवयीन भूमिका साकारताना दिसत आहे.

दुसऱ्या टिझरमध्ये अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर यांच्यातली प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या सिनेमाचा हा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे.

तेजश्री प्रधान ही ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तसेच तिने ‘शर्यत’, ‘झेंडा’, ‘लग्न पाहावे करून’ असे अनेक सिनेमेदेखील केले आहेत. ती सध्या अभिनेता शर्मन जोशीसोबत ‘मैं और तुम’ हे हिंदी नाटक करत आहे. तर अंकुश चौधरी याने मराठी सिनेसृष्टीला ‘दगडी चाळ’, ‘क्लासमेट’, ‘दुनियादारी’, ‘गुरू’, ‘डबलसीट’, ‘शहाणपण देगा देवा’ असे एक से एक सुपरहीट सिनेमे दिले आहेत.’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 8:02 pm

Web Title: marathi movie sadhya ti kay kartes 2nd teaser release
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांचे लाइव्ह फेसबुक चॅट, चाहत्यांच्या प्रश्नांना दिली उत्तरे
2 अभिनयासोबत या चित्रपटात आलिया गातानाही दिसणार?
3 …म्हणून जॉन, सलमानला सोडून करिना गेली शाहीदकडे
Just Now!
X