महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीतील दक्षिण महाराष्ट्रातले एक थोर संत म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान झाले आहेत. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भूरळ घातली. मात्र आता मालिकेत बाळूमामांचं बालपण संपून ते मोठ्या रुपात अवतरणार आहेत. आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवणारे बाळूमामा मालिकेत लवकरच मोठ्या रुपात दिसणार आहेत.

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये आता नवा अध्याय सुरु होणार असून यात बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडणार आहे. दिनदुबळ्यांचा कैवार घेणारे, गरीबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे संत बाळूमामा यांची ही चरित्रगाथा एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या महान संताची चरित्रगाथा “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” २० मे पासून आता आणखी रंजक स्वरुपात पहायला मिळणार आहे.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या या मालिकेतील बाल अवतारातील बाळूमामांना रसिकांनी देवत्व देण्याबरोबरच आपल्या घरातल्या लाडक्या व्यक्तीसारखं प्रेम केलं. म्हणूनच छोटे बाळूमामा हे महाराष्ट्रातील घराघरातलं लाडकं व्यक्तिमत्व बनलं. बाळूमामांबरोबरच त्यांना सतत आधार देणारी, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्यांची आई सुंदरा, त्यांना सतत विरोध करणारा त्यांचा पिता मयप्पा, गावातील पंच, वैजयंता, कळलाव्या तात्या, महादू, देवप्पा, मंगळू, गंगी, सत्यवा ही पात्रं मालिकेतील पात्रं न रहाता प्रेक्षकांच्या घरातलीच पात्रं बनली आहेत.