छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका सध्या एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. रोज या मालिकेमधून प्रेम आणि राधा यांच्या जीवनातील एक एक पैलू उलगडताना दिसत आहे. यातच आता राधा आणि प्रेम या दोघांचाही जीव धोक्यात असल्याचं दिसून येत आहे.

दीपिकाचा व्यवसाय आणि आयुष्य मार्गी लागण्यासाठी प्रेमचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे संगिता म्हणजेच लल्लनची बहीण प्रेमच्या घरी रहायला आली आहे. विशेष म्हणजे लल्लन आणि प्रेम हे दोघं सारखे दिसत असल्यामुळे संगिता त्याला लल्लन समजून बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. परंतु तो लल्लन नसून प्रेमच आहे हे संगिताला माहित नाही.

संगिताला लल्लनच्या आयुष्यामधून दीपिकाला कायमचे काढून टाकायचे आहे. याच दरम्यान राधाला एक वाईट स्वप्न पडते ज्यामध्ये प्रेमबरोबर काहीतरी वाईट होणार आहे असे संकेत तिला मिळतात. राधा आणि प्रेमच्या जीवाला कोणापासून धोका आहे ? संगिता दीपिकाला लल्लनच्या आयुष्यामधून काढून टाकण्यामध्ये यशस्वी होईल का ? राधा प्रेमला वाचवू शकेल का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. हे सगळ जाणून घेण्यासाठी बघत रहा राधा प्रेम रंगी रंगली सोम ते रवि. रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.