‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलंय. रांगडा ‘राणा दा’ आणि अंजली बाईंचा सुरेख प्रवास आता फार रंजक वळणावर आलाय. बऱ्याच गाजलेल्या मालिकांच्या गर्दीतही हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोन्ही कलाकरांनी आपली अशी वेगळी ओळख निर्माण केलीय. या मालिकेचा प्रेक्षकवर्गही दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे गावाकडील बाज असलेल्या ‘राणा’च्या म्हणजेच हार्दिक जोशीच्या ‘फिमेल फॅन फॉलोअर्स’चा आकडाही दिवसेंदिवस वाढतोच आहे.

यातही एक अशी फॅन आहे, जिच्यात खुद्द ‘राणा’चाच जीव रंगला आहे. ती आहे तरी कोण, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशीने स्वत:च त्याचा जीव कोणात रंगलाय याबाबतचा खुलासा केला आहे. हार्दिकने सोशल मीडियावर एक सुरेख फोटो शेअर केला असून, तिची झलक सर्वांनाच दाखवली आहे. आता तुम्हाला वाटेल ही नेमकी आहे तरी कोण, कोणतेही तर्क लावण्याआधी हा फोटो पाहा. कारण, ही आहे हार्दिकची सर्वात लहान फॅन. अवघ्या एक महिन्याची असलेली ही चिमुरडी आपली सर्वात भारी फॅन आहे असंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

हार्दिकने शेअर केलेला हा फोटो पाहता अनेकांनाच त्याची ही फॅन वेड लावतेय असं म्हणायला हरकत नाही. गणपतीच्या निमित्ताने या ‘लय भारी’ फॅनची भेट घेऊन ‘राणा दा’ म्हणजेच हार्दिकला फार आनंद झाला आहे असंच म्हणावं लागेल.