News Flash

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये होणार हुरडा पार्टी !

अभिमन्यू-लतिकासाठी खास हुरडा पार्टीचं आयोजन

कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’. अभिमन्यू आणि लतिका यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावत असल्यामुळे सध्या ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेत अत्यंत रंजक वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिमन्यूचा लतिकावरचा राग कमी झाला असून दिवसेंदिवस त्यांच्यातील मैत्री दृढ होताना दिसत आहे. यामध्येच आता जहागीरदार कुटुंबात हुरडा पार्टीचं आयोजन केलं आहे.

लतिकाची साथ मिळाल्यामुळे अभिमन्यूचं स्पोर्ट्स अॅकॅडमी काढण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. नुकतंच अॅकॅडमीच्या जागेचं भूमिपूजन झालं आहे. त्यांमुळे जहागीरदार कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी हुरडा पार्टी करण्यात येणार आहे.

जहागीरदार कुटुंबाने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अगदी घरातली मोजकी मंडळी सहभागी होणार आहेत. यात माई, आप्पा, अभी, लतिका, लतिकाची आई, आजी, बापू मज्जा मस्ती करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे ही हुरडा पार्टी खास अभिमन्यू आणि लतिका यांच्यासाठी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 10:07 am

Web Title: marathi tv show sundara manna madhe bharle hurda party ssj 93
Next Stories
1 आता होणार ‘हंगामा’; शिल्पा शेट्टीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक
2 अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्याविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे बिग बी ट्रोल
3 जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगना चौकशीसाठी गैरहजर
Just Now!
X