News Flash

बाबांनी दिलेल्या आत्मशक्तीने बळ!

दीनानाथ पुरस्कार सोहळ्यात आशाताईंच्या भावना

आशा भोसले

दीनानाथ पुरस्कार सोहळ्यात आशाताईंच्या भावना

बाबांचे कष्ट, त्यांची आत्मशक्ती आम्हा सर्वच मंगेशकर भावंडांमध्ये उतरली. बाबांनी दिलेल्या आत्मशक्तीने आम्हांला बळ मिळून गरूडझेप घेता आली. अशा शब्दात पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळया दरम्यान आपल्या भावना प्रकट केल्या. ‘मास्टर दिनानाथ स्मृती प्रतिष्ठान’ आणि ‘ह्रदयेश आर्ट्स’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळा विलेपार्ले येथील पार्ले-टिळक विद्या मंदिरात पार पडला.

कार्यक्रमात ‘मास्टर दीनानाथ प्रदीर्घ संगीत सेवा’ हा पुरस्कार पंडित अजय चक्रवर्ती यांना देण्यात आला. उत्कृष्ट नाटकासाठीचा मोहन वाघ पुरस्कार ‘दोन स्पेशल’ या नाटकाला मिळाला. प्रदीर्घ साहित्यसेवेचा ‘वाग्विलासिनी’ पुरस्कार लेखक अरूण साधू यांना तर ‘प्रदिर्घ पत्रकारिता’ पुरस्कार दिलीप पाडगावकर यांना देण्यात आला. ‘प्रदीर्घ नाटय़सेवेसाठी विशेष पुरस्कार’ अभिनेते प्रशांत दामले यांना तर, ज्येष्ठ अभिनेते जीतेंद्र यांचा हिंदी चित्रपटसेवेचा ‘मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेता रणबीर सिंग यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. प्रकृती ठिक नसल्याने लता मंगेशकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 2:30 am

Web Title: master dinanath mangeshkar award asha bhosle
टॅग : Asha Bhosle
Next Stories
1 भावगीतांची नव्वदी
2 नृत्य..ऑनलाइन!
3 मॅच फिक्सिंगमधील दडलेल्या गोष्टींचा पट..
Just Now!
X