14 October 2019

News Flash

‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील या लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलं का?

या अभिनेत्रीने सत्तरच्या दशकातील चित्रपट गाजवले होते

झीमराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सध्या घराघरामध्ये पोहोचली आहे. ही मालिका टीआपरीच्या यादीमध्ये देखील नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असते. या मालिकेतील शनाया आणि गॅरीची जोडी जितकी चर्चेत असते तितकीच राधिका आणि सौमित्रची मैत्री रसिकांना पाहायला आवडते. मालिकेची कथा चाहत्यांच्या चांगलीच पसंतीला उतरुन असून पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आता ही मालिका एका नव्या वळाणावर पोहोचली आहे. मालिकेत सौमित्रच्या आईची एण्ट्री झाली आहे.

सौमित्रची आई म्हणून अभिनेत्री वंदना पंडित यांची मालिकेत एण्ट्री झाली आहे. वंदाना यांनी कित्येक वर्षानंतर कमबॅक केला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यांच्या या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतात.

वंदना यांच्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटाने सत्तराच्या दशकात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीमधील निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत होते. ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा…’ हे या चित्रपटातील गाणे अनेकजण गुणगुणताना दिसतात. वंदना यांना ‘अष्टविनायक’ या चित्रपटाने एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली होती. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले. आता इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा वंदना यांना छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

First Published on October 10, 2019 5:01 pm

Web Title: mazhya navryachi bayko character saumitra mother 70s famous actress avb 95