21 January 2021

News Flash

‘ये किस लाइन मे आ गए आप?’; सैफच्या आत्मचरित्रावरून भन्नाट मीम्स व्हायरल

अभिनेता सैफ अली खानने आत्मचरित्र लिहिणार असल्याचं जाहीर केलं.

सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खानने आत्मचरित्र लिहिणार असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या आत्मचरित्रात चित्रपटसृष्टीतील प्रवास, खासगी जीवन, यशापयश आणि जीवनाशी निगडीत इतर महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश पाडला जाईल. सैफने आत्मचरित्राबाबत जाहीर करताच सोशल मीडियावर त्यावरून चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी त्यावरून भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल केले आहेत.

हे कोणत्या क्षेत्रात तू आलास, आत्मचरित्र लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली अशा प्रश्नांवरून हे हास्यास्पद मीम्स तयार करण्यात आले आहेत. तर काहींनी तैमुरची प्रतिक्रिया काय असेल यावरूनही मीम्स व्हायरल केले आहेत. सैफच्या आत्मचरित्राचं नाव काय असेल यावरूनही मीम्स तयार करण्यात आले आहेत.

याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बदलल्या आहेत आणि त्यांचं जतन करून न ठेवल्यास बदलत्या वेळेनुसार त्या हरवतील. एकदा मागे वळून त्या सर्व गोष्टी साठवून घेणं चांगलंच आहे. हा एका प्रकारे स्वार्थी प्रवास आहे पण मला यावर पूर्ण विश्वास आहे की लोकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.” सैफच्या आत्मचरित्राचं नाव काय असेल हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर त्यावरून जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 6:01 pm

Web Title: memes viral about saif ali khan penning his autobiography ssv 92
Next Stories
1 सैफ अली खान लिहिणार आत्मचरित्र
2 स्वत: वर तयार केलेलं रॅपसाँग पाहून कोकिलाबेनने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
3 २० मिनिटांत १ कोटी लोकांनी पाहिला ‘हा’ व्हिडीओ; तुटला YouTube चा जुना विक्रम
Just Now!
X