20 November 2019

News Flash

रणवीरसोबत राहू नका, कपिल देव यांना नेटकऱ्यांचा सल्ला

'83' या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. रणवीरने त्याच्या वाढदिवसानिमित्त ’83’ चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला. या लूकमध्ये रणीवर हुबेहुब कपिल यांच्यासारखा दिसत आहे.

रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दरम्यान नेटकऱ्यांना कपिल देव यांचा सोशल मीडियावर एक फोटो सापडला. या फोटोमुळे कपिल देव यांना ट्रोल करण्यात आले आहे. या फोटोमध्ये कपिल यांनी लाल रंगाचा टीशर्ट परिधान केला असून रंगीबेरंगी पट्यांची पॅन्ट परिधान केली आहे. त्यांच्या या फोटोवर नेकऱ्यांनी ‘आता कपिल देव रणवीर सिंगचा बायोपिक करणार का? संगतचा असर, रणवीरसोबत राहू नका’ असे म्हणत कपिल देव यांना ट्रोल केले आहे.

First Published on July 9, 2019 11:18 am

Web Title: memes viral on kapil dev dress avb 95
Just Now!
X