News Flash

१० दिवसांत करोनाने घेतला चौथ्या संगीतकाराचा बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

जगभरात करोनाचा थैमान अद्याप थांबलेला नाही

करोना विषाणूने संपूर्ण जगात सध्या थैमान घातले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या यादीत आता आणखी एका कलाकाराचे नाव जोडले गेले आहे. प्रसिद्ध मॅक्सिकन संगीतकार ऑस्कर चावेझ यांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ते ८५ वर्षांचे होते.

मॅक्सिकोच्या सांस्कृतिक विभागाच्या सचिवांनी या बातमीला दुजोरा दिला. त्यांना मंगळवारी सकाळी करोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ऑस्कर चावेझ हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित संगीतकार होते. मॅक्सिकोमध्ये त्यांना ‘प्रोटेस्ट सिंगर’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आजवर पोर टी, माकोनाडो, सीन अन अमोर, ला कास्टिका यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांची निर्मिती केली होती. ते एक लोकप्रिय समाजसेवक देखील होते. गरीबांच्या मदतीसाठी त्यांनी अनेक स्टेज शो केले आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये बिल कार्पेंटर, अ‍ॅलन मेरल, जॉन प्राइन या तीन प्रसिद्ध संगीतकारांचा मृत्यू झाला. या यादीत आता ऑस्कर चावेझ यांचे नाव जोडले गेल्यामुळे हॉलिवूड संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 1:43 pm

Web Title: mexican protest singer oscar chavez dies of coronavirus mppg 94
Next Stories
1 Video : भारतीय संस्कृतीची खिल्ली उडविणाऱ्याची ऐश्वर्याने केली बोलती बंद!
2 ‘कॅप्टन अमेरिका’सोबत डेटवर जा अन् करोनाग्रस्तांची मदत करा
3 ऋषी कपूर यांच्या अंतिम क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; रुग्णालय प्रशासनाला बजावली नोटीस
Just Now!
X