News Flash

‘या’ शहरांत ‘मिर्झापूर २’च्या कलाकारांचे भव्य कटआऊट्स

२३ ऑक्टोबर रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

गुन्हेगारी विश्वावर आधारित असलेल्या मिर्झापूर या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उद्या, २३ ऑक्टोबर रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तसेच काही शहरांमध्ये या सीरिजचे मोठे कटआऊट लावण्यात आले आहेत.

वाराणसी, आग्रा, गाझियाबाद, बरेली, मेरठ, लखनऊ आणि कानपूर येथे मिर्झापूर २चे मोठे कटआऊट लावण्यात आले आहेत. यामध्ये गुड्डू पंडित, कालीन भैय्या आणि मुन्ना भाईचे कटआऊट लावण्यात आले आहे. तसेच या कटआऊट खाली एक क्यूआर कोड देण्यात आला आहे. जो स्कॅन करुन चाहत्यांना मिर्झापूरच्या सिंहासनावर कोण बसणार यासाठी एका कालाकराची निवड करायची आहे. तसेच चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराला मत देऊ शकतात. हे कट आऊट पुढचे १५ दिवस ठेवण्यात येणार आहेत.

‘मिर्झापूर’ या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये गुड्डूला गोळ्या लागल्या होत्या. पण सुदैवाने तो बचावतो. आता ‘मिर्झापूर २’मध्ये गुड्डूचा कालीन भैय्या आणि मुन्ना यांच्याशी सामना होणार आहे. तसेच आता रती शंकरचा मुलगाही गुड्डू पंडितचा शोध घेतल असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे.

‘मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २३ ऑक्टोबरपासून ‘मिर्झापूर २’ या वेबसीरिजचा दुसरा सिझन अॅमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार आहे. उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे आता ‘मिर्झापूर २’साठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 5:18 pm

Web Title: mirzapur 2 is going to release tomorrow avb 95
Next Stories
1 रिलेशनशिप स्टेटसबद्दल कियारा म्हणते, “लग्न होईपर्यंत मी…”
2 ‘मुद्दा लोकांना हसवण्याचा नाही…’, मुकेश खन्नांनी दिले कपिल शर्माला उत्तर
3 शर्मिला राजाराम ‘ब्रेकिंग न्यूज’च्या मागे; नेमकं काय आहे प्रकरण?
Just Now!
X