News Flash

या चित्रपटामधून अमरिश पुरी यांचा नातू करणार सिनेसृष्टीत पदार्पण

अमरिश पुरी यांचे बॉलिवूड सिनेसृष्टीत आदराने नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांचा नातू वर्धन याच्याकडूनही प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.

‘मोगॅम्बो खुश हुआ’ असे म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचा नातू वर्धन पुरी हा देखील आता इतर स्टारकिड्सप्रमाणेच बॉलिवूडच्या दिशेने वळला आहे. चिराग रूपारेल दिग्दर्शित ‘पागल’ या चित्रपटातून वर्धन बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पणाची तयारी करत आहे. अभिनेत्री शिवालीका ओबेरॉय या चित्रपटात त्याच्याबरोबर क्रीन शेअर करताना दिसेल.

वर्धनसाठी हे कलाविश्व काही नवे नाही. त्याने याआधी ‘इशकजादे’, ‘दावत-ए-इश्क’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शनाचेही काम केले आहे. आपल्या पदार्पणाविषयी अधिक माहिती देताना वर्धन म्हणाला होता, “मी जयंतीभाई यांच्यासोबत एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या चित्रपटापासून सुरुवात करणार होतो. पण, काही कारणास्तव तसे होऊ शकले नाही. त्यानंतर मला त्यांनी पागल या चित्रपटासाठी विचारले आणि मी त्यासाठी लगेचच तयारही झालो.” सध्याच्या घडीला वर्धन त्याच्या भूमिकेच्या तयारीला लागला असून, त्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा कार्यशाळांनाही हजेरी लावत आहे. आपल्या आजोबांच्या म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरिश पुरी यांच्या

चित्रपटांपैकी ‘विरासत’, ‘घातक’, ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे त्याचे सर्वात आवडीचे चित्रपट आहेत.
वर्धनच्या निमित्ताने आता आणखी एका स्टारकिडचे बॉलिवूडमध्ये आगमन होणार आहे. दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अमरिश पुरी यांचे बॉलिवूड सिनेसृष्टीत आदराने नाव घेतले जाते. त्यामुळे त्यांचा नातू वर्धन याच्याकडूनही प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 11:37 am

Web Title: mogambo amrish puri vardhan puri pagal mppg 94
Next Stories
1 बॉलिवूडच्या दिग्गजांपेक्षाही रजनीकांतची कमाई अधिक , वाचून बसेल धक्का
2 एकदा नाही तर दोनदा झालं होतं रानू मंडल यांचं लग्न? जाणून घ्या खरं कारण
3 रानू मंडल यांच्या गाण्याची नक्कल करण्याविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X