देशात दिवसागणिक वाढणाऱ्या बलात्काराच्या घटनांबद्दल आता सर्वच स्तरातून असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. वृत्तपत्रांपासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत, गल्लीबोळापासून कलाविश्व आणि राजकीय पटलापर्यंत याविषयीच्याच चर्चा सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी कठुआ येथे अवघ्या आठ वर्षांच्या मुलीचा बलात्कार आणि हत्याप्रकरणी सर्वांच्याच काळजात चर्र झालं.

अनेकांनी याविषयी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. या सर्व घटनांविषयी कलाविश्वातूनही निषेध व्यक्त करण्यात आला. ज्यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचं. दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांविषयी पोलिसांमध्ये होणाऱ्या तक्रारींची वाढती संख्या ही गोष्ट एका अर्थी सकारात्मक बाब आहे, असं म्हणत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

वाचा : बलात्कार करणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही; रेणुका शहाणे यांची जळजळीत पोस्ट

‘होप और हम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी त्यांनी कठुआ बलात्कार प्रकरणी आपलं मत मांडलं. ‘बलात्कार आपल्यासाठी नवा शब्द किंवा नवी गोष्ट नाही. ही दुष्कृत्य नेहमीच होत असतात. पण, हल्लीच्या दिवसांमध्ये सकारात्मक बाब म्हणजे याविषयी खुलेपणाने बोललं जात सर्वस्वी व्यक्तिगत मत असल्याचं त्यांनी न विसरता सांगितलं. बलात्काराविषयी लोकांचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असून, हा एका रात्रीत होणारा बदल नसल्याचं सांगत प्रत्येक मुलीवर नजर ठेवणं अश्क्य असून सर्वच मुलींकडे आत्मसंरक्षणासाठी एखादं हत्यार किंवा मार्शल आर्ट्चं प्रशिक्षण नसतं या महत्त्वाच्या मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.