News Flash

हनिमूनचे फोटो पोस्ट केल्याने खासदार नुसरत जहाँ ट्रोल

इन्स्टाग्रामवर नुसरत यांनी हनिमूनचे रोमॅण्टिक फोटो पोस्ट केले आहेत पण हे फोटो काही नेटकऱ्यांना रुचले नाहीत.

नुसरत जहाँ

नवविवाहित व नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. लग्नानंतर दोन महिन्यांनी नुसरत हनिमूनला गेल्या आहेत. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या नुसरत यांनी इन्स्टाग्रामवर बरेच फोटो पोस्ट केले आहेत. मात्र हे फोटो काही नेटकऱ्यांना रुचले नाहीत. संसदेत जाऊन काम करा, असा सल्ला नेटकऱ्यांनी त्यांना दिला आहे.

नुसरत जहाँ ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. खासदार झाल्यानंतर त्यांचा एक जुना टिकटॉक व्हिडीओ चर्चेत आला होता आणि त्यावरूनही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यांनंतर संसदेबाहेर काढलेल्या एका फोटोमुळेही नुसरत आणि खासदार मिमी चक्रवर्ती ट्रोल झाल्या होत्या.

नुसरत जहाँ या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत त्यांनी टर्कीमध्ये लग्नगाठ बांधली. सोशल मीडियाने सर्वांत सुंदर खासदार असा किताब दिलेल्या नुसरत यांनी टर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं. खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी लग्नाची घोषणा केली होती. लग्नासाठी त्यांनी शपथविधी सोहळा चुकवला होता. नुसरत व निखिल यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 7:13 pm

Web Title: mp nusrat jahan trolled for her honeymoon pictures ssv 92
Next Stories
1 वीणाने पापण्यांवर कोरलं शिवचं नाव
2 American Crime Story : बिल क्लिंटन-मोनिका लेविंस्की प्रेम प्रकरण दिसणार तिसऱ्या सीझनमध्ये
3 ‘साहो’मध्ये चंकी पांडे साकारणार खलनायक; लूक व्हायरल
Just Now!
X