05 March 2021

News Flash

नागार्जुनच्या मुलाची ‘एक्स’ आता दुसऱ्याच बरोबर करतेय लग्न

हे प्रेमीयुगुल इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार होते

दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार नागार्जुनचा छोटा मुलगा अखिल अक्कीनेनीचे काही दिवसांपूर्वीच लग्न मोडले होते. अखिलची ‘एक्स’ श्रीया भूपल आता एका अनिवासी भारतीयाशी लग्न करणार आहे.  प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, श्रीयाचे आई-वडिलही या लग्नासाठी तयार आहेत. अखिल आणि श्रीया मे महिन्यात इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार होते. अखिल-श्रीया यांच्यात काही कारणावरून बिनसले आणि दोघांनीही हे नाते थांबविण्याचा निर्णय घेतला होता.

श्रीया ही प्रसिद्ध व्यावसायिक जीव्हीके रेड्डी यांची नात असून, अभिनेता नागार्जुन आणि जीव्हीके रेड्डी यांनी या दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याचा फारसा काही परिणाम या दोघांवर झाला नाही. अखेर त्यांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी जवळपास सहाशेहून अधिक पाहुणे मंडळी भारतातून इटलीला जाणार असल्याचेही म्हटले जात होते. पण अचानक साखरपुडा मोडल्यामुळे सर्वांना त्यांची विमानाची तिकीटं रद्द करायला सांगण्यात आली.

nagarjun-1

लग्न ठरण्याआधीच जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये हैदराबादच्या विमानतळावर कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर दोघांमध्ये दरी वाढत गेली आणि त्यांनी साखरपुडा तोडण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 3:55 pm

Web Title: nagarjuna son akhil akkineni ex fiancee to marry another guy
Next Stories
1 झरीनच्या घरी रंगतोय ‘हॉरर’ सिनेमा अन् मालिकांचा खेळ!
2 ‘सुनील तू कपिलला माफ कर’
3 ‘क्वीन’च्या दिग्दर्शकाने तरुणीसोबत गैरवर्तणूक केल्याचे वृत्त फेटाळले
Just Now!
X