01 March 2021

News Flash

‘सिगरेट दे अन्यथा घरातील सर्वांना उपाशी ठेवेन’; अभिनेत्रीने दिली धमकी

एका सिगरेटच्या पाकिटासाठी अभिनेत्री भिडली; अभिनेत्याला दिली जेवण न करण्याची धमकी

‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनला मोठ्या धुमधड्यात सुरुवात झाली आहे. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता चार आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी या शोमधील सर्व स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी एकमेंकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान अभिनेत्री नैना सिंह आणि एजाज खानमध्ये झालेलं भांडण सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हे दोन स्पर्धक चक्क एका सिगरेटच्या पाकिटासाठी भांडण करत आहेत. “जर सिगरेट मिळाले नाही तर मी जेवण करणार नाही” असा धमकीवजा इशारा तिने एजाज खानला दिला आहे.

अवश्य पाहा – १४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले; आमिरच्या मुलीचा धक्कादायक खुलासा

अवश्य पाहा – KBC मुळे अमिताभ झाले करोडपती; एका एपिसोडचं मानधन पाहून व्हाल थक्क

प्रकरण काय आहे?

नैनाने जान कुमार सानूची ग्रीन टी न सांगता घेतली. सध्या बिग बॉसच्या घरात ग्रीन टी हा एक लक्झरी प्रोडक्ट आहे. नियमाप्रमाणे एखाद्या टास्कमध्ये जिंकलेले स्पर्धकच लक्झरी प्रोडक्टचा वापर करु शकतात. या पार्श्वभूमीवर एजाज खानने नैनाबाबत संताप व्यक्त केला. शिवाय शिक्षा म्हणून तिच्या सिगरेटचे पॅकेट्स स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले. एजाजच्या या कृतीवर नैना संतापली अन् तिने जेवण न करण्याचा इशारा दिला आहे. “जर तिला तिचं सिगरेटचं पॅकेट्स परत मिळालं नाही तर घरातील कोणालाही जेवण मिळणार नाही” असा इशारा तिने बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांना दिला आहे. एजाज आणि नैनामधील या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 7:34 pm

Web Title: naina singh eijaz khan bigg boss 14 cigarette packet mppg 94
Next Stories
1 ‘जिथे माझं मन, तिथे…’; प्रियांकाने शेअर केला निकसोबतचा खास फोटो
2 Video : ‘तात्या विंचू’साठी दिलीप प्रभावळकरचं का? महेश कोठारे म्हणतात…
3 १४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले; आमिरच्या मुलीचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X