09 March 2021

News Flash

पुष्पक चित्रपट झळकणार आता छोट्या पडद्यावर

घरी बसून कुटुंबासोबत घेता येणार आनंद

भारतीय सिनेमाच्या इतिहासातील ८०चे दशक प्रामुख्याने ओळखले जाते ते तद्दन व्यावसायिक चित्रपटांच्या लाटेसाठी. भारतीय चित्रपटांचा ‘मूक कालखंड’ संपून गेल्यानंतर कितीतरी दशकानंतर; १९८८ साली बनवला गेलेला ‘पुष्पक’ म्हणजे साचेबद्ध कल्पनांमध्ये घुसमटलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक वेगळी दिशा देणारा ठरला. टीव्हीच्या छोट्या पडद्यावर तो प्रथम प्रसारित करण्यात आला तेव्हा अनेक जण त्याचे चाहते बनले. या चित्रपटाने भारतातील प्रायोगिक सिनेमाला एक नवी वाट दाखवून दिली आणि स्वप्न बघण्याचे धाडस करणाऱ्या संगीतम श्रीनिवासन राव यांच्यासारख्या दिग्दर्शकाला प्रसिद्धीच्या झोतात आणले. भारतातील हिंदी चित्रपट वाहिन्यांमधील आघाडीची वाहिनी असलेल्या Sony MAX2 यावर आता तो रसिकांना पाहता येणार आहे. २१ जुलै रोजी रात्री १० वाजता या चित्रपटाचे प्रसारण करणार आहे.

पुष्पक या सिनेमाने मूकपट म्हणून व्यावसायिक चित्रपटांच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून टाकल्या हे खरे असले तरीही प्रेम, गुन्हेगारी, थरार आणि विनोद यातल्या एकाही आघाडीवर तो कोणत्याही व्यावसायिक सिनेमापेक्षा उणा नव्हता. या साऱ्याला साथ लाभली होती ती कलाकारांच्या सशक्त अभिनयाची. या चित्रपटाचे कथानक एका बेरोजगार तरुणाच्या (कमल हसन) भोवती फिरते. या तरुणाला काही काळासाठी एका गडगंज व्यापाऱ्याशी (समीर कक्कर ) आपल्या आयुष्याची अदलाबदल करण्याची न भूतो न भविष्यती अशी संधी मिळते. एका जादुगाराच्या मुलीच्या (अमला) प्रेमात पडल्यावर त्याचे आयुष्य वेगळे वळण घेते. मात्र श्रीमंत माणूस म्हणून जगण्याचा त्याचा आनंद अगदी थोडाच काळ टिकतो कारण त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या जीवावर उठलेला एक धंदेवाईक मारेकरी आता त्यालाच व्यापारी समजून छळू लागतो. एका बाजूला प्रेम आणि दुसऱ्या बाजूला खुद्द जगण्यामरण्याचा प्रश्न अशा या दुविधेतून नायक कसा मार्ग काढतो हे जाणून घेण्यासाठी पुष्पक पहायलाच हवा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 7:50 pm

Web Title: national award winning movie pushpak to air on sony max2
Next Stories
1 Bigg Boss Marathi : अंतिम फेरीत पोहोचलेले स्पर्धक देणार पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं
2 ११ लाखांचे दागिने हिनानं परत केलेच नाही, ज्वेलर्सचा आरोप
3 स्ट्रीट फाईटर ते अब्जाधीश…. जाणून घ्या ‘द रॉक’चा प्रवास
Just Now!
X