News Flash

दुहेरी अर्थाच्या विनोदांविरुद्ध नवज्योत सिद्धू

माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्घू हा आता एका 'कॉमेडी शो'मध्ये दिसणार आहे. हा शो संपूर्ण कुटुबांने एकत्रित पाहण्यासारखा असल्याने यामध्ये कोणतेही दुहेरी अर्थाचे विनोद

| June 19, 2013 09:02 am

माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्घू हा आता एका ‘कॉमेडी शो’मध्ये दिसणार आहे. हा शो संपूर्ण कुटुबांने एकत्रित पाहण्यासारखा असल्याने यामध्ये कोणतेही दुहेरी अर्थाचे विनोद असणार नाहीत. माझ्यासाठी विनोदाचा अर्थ लोकांना हसवणे असा आहे, असे सिद्धूने सांगितले.
बिग बॉस या रिअॅलिटी शोनंतर सिद्धू आता ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल ‘ यामध्ये सहभागी होणार आहे. हा शो २२ जूनपासून कलर्स वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. सिद्धू कपिल शर्मा सोबत मजेदार विनोद करताना दिसेल. आपण दुहेरी अर्थाच्या शोच्या विरुद्ध असून हा एक कौटुंबिक कॉमेडी शो असणार आहे. यात कोणताही अतिरेक होईल, काही मानहानीकारक किंवा जे कुटुंबासाठी अर्थपूर्ण नसतील असे कोणतेही विनोद आम्ही करणार नाही. विनोदामुळे लोकांचा तणाव थोडा कमी होतो. तेच काम आम्ही या शोमधून करणार आहोत, असे सिद्धू म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 9:02 am

Web Title: navjot sidhu against double meaning jokes
Next Stories
1 ‘झपाटलेला २’चा गल्ला साडेतीन कोटी रुपये
2 ‘ मेंटल‘फेम सना खानला अटकपूर्व जामीन मंजूर
3 फ्रेडा पिंटो बनली ‘गर्ल राइजिंग’ अनुबोधपटाचा हिस्सा
Just Now!
X