24 September 2020

News Flash

नवाजुद्दीनच्या अडचणीत वाढ? पत्नीने पुन्हा केली पोलिसांत तक्रार

नवाजुद्दीनच्या विरोधात पत्नीची पुन्हा तक्रार

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या पत्नीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलियाने नवाजवर काही आरोप केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आलियाने नवाजवर आरोप केले आहेत. तसंच तिने नवाज आणि त्याच्या कुटुंबातील अन्य चार सदस्यांविरुद्ध बुढाना येथे पोलीस तक्रार दाखल केली आहे.

‘इंडिया टुडे’नुसार,२७ जुलै रोजी आलियाने मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये नवाजुद्दीन सिद्धीकी आणि त्याच्या कुटुबांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता तिने मुजफ्फरनगर येथील बुढानामधील एका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दीकीने इमेलद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. नवाजुद्दीन व आलियाच्या लग्नाला १० वर्षे झाली असून या दोघांना दोन मुलं आहेत. लग्नाला एक वर्ष झालं, तेव्हापासूनच वैवाहिक जीवनात चढउतार सुरू झाल्याचं आलियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 1:48 pm

Web Title: nawazuddin siddiquis wife aaliya records her statement at budhana police station ssj 93
Next Stories
1 “या देशात अल्पसंख्यांक असणं गुन्हा आहे”; उमर खलिदच्या अटकेवर अभिनेत्याने व्यक्त केला संताप
2 प्रिती झिंटाला क्वारंटाइनमध्ये मिळतंय असं जेवण; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 कंगना म्हणते, “मला कधी पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली तर…”
Just Now!
X