बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी नेहा सनी हिंदूस्तानीमुळे चर्चेत आहे. “जर नेहा कक्कर नसती तर मी इंडियन आयडॉल जिंकूच शकलो नसतो” असे आवाक् करणारे विधान इंडियन आयडॉलच्या विजेत्याने केले आहे.

काय म्हणाला इंडियन आयडॉलचा विजेता?

इंडियन आयडॉल या प्रसिद्ध संगीत रिअॅलिटी शोचे ११ वे पर्व नुकतेच संपले. या पर्वात सनी हिंदूस्तानी विजयी ठरला. त्याने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपल्या विजयाचे श्रेय नेहा कक्करला दिले आहे.

सनीचा जन्म पंजाबमधील अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. अथक परिश्रम आणि अफाट जिद्द यांच्या जोरावर सनी इंडियन आयडॉलपर्यंत पोहोचला. या शोमध्ये भाग घेण्यासाठी त्याला मुंबईला येणे गरजेचे होते. त्यासाठी त्याच्याकडे पुरसे पैसे देखील नव्हते. परंतु नेहाने त्याला स्वत:च्या खर्चातून मुंबईत आणले. शिवाय मुंबईतील त्याचा खाण्यापिण्याचा आणि राहाण्याचा खर्च नेहानेच केला. त्यामुळे त्याने इंडियन आयडॉलच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर आपल्या विजयाचे संपूर्ण श्रेय त्याने नेहाला दिले.