11 November 2019

News Flash

Sacred Games 2 : 15 जूनला भेटीला येणार ?

गेल्या वर्षातली ही सर्वात गाजलेली सीरिज आहे या सीरिजचा दुसरा सिझन येणं बाकी आहे

Sacred Games ही नेटफ्लिक्सवरची सीरिज गेल्या वर्षात चांगलीच गाजली. या सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेमकी ही तारीख काय? यावर विविध चर्चा रंगल्या आहेत. अशात नेटफ्लिक्सने या सीरिजबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर ही सीरिज १५ जूनला येणार का? अशीही चर्चा रंगली आहे. नेटफ्लिक्सच्या इंस्टा अकाऊंटवर कुक्कू ( कुब्रा सेठ) काटेकर (जितेंद्र जोशी), बंटी (जतिन सराना) आणि अंजली माथूर (राधिका आपटे) यांचे फोटो लहान मुलांच्या रूपात एडिट करून २५ दिनमें स्कूल शुरू होनेवाला है असं वाक्य लिहिलं आहे. म्हणूनच १५ जूनला या सीरिजचा दुसरा सेशन येणार का? अशी चर्चा सुरू झाली असून त्याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.

 

View this post on Instagram

 

25 din mein school shuru hone wala hain.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

काही दिवसांपूर्वीच एका छोट्या टिझरमध्ये या सरताज सिंग, गणेश गायतोंडे, यांच्यासह गुरूजी दाखवण्यात आले आहेत. त्याचसोबत कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी या दोन नव्या व्यक्तिरेखांचा सेक्रेड गेम्स २ मध्ये समावेश करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे. आता या सीरिजचा दुसरा सिझन १५ जूनला येणार का? जर तो आला नाही तर १५ जूनला नेमकं काय सुरू होणार? या सगळ्याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

सेक्रेड गेम्स ही गणेश गायतोंडे या डॉनची आणि सरताज सिंग या पोलीस इन्स्पेक्टरची कहाणी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने गणेश गायतोंडे आणि सैफ अली खानने सरताज सिंगची भूमिका साकारली आहे. सेक्रेड गेम्स या वेबसीरिजचा पहिला सिझन चांगलाच गाजला. यामधल्या कुक्कू, बंटी, काटेकर, सुभद्रा, परूळेकर, बिपिन भोसले या सगळ्या व्यक्तीरेखाही चांगल्याच गाजल्या. ही कहाणी २५ दिवसांची आहे. २५ दिवसात असं काहीतरी होणार ज्यामुळे सगळं शहर उद्ध्वस्त होईल त्याभोवतीही ही कथा फिरते. आता इंस्टावर २५ दिनमें स्कूल शुरू होनेवाला है असं पोस्ट केल्याने २५ दिवसांनी नेमकं काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

First Published on May 21, 2019 5:53 pm

Web Title: netflix drops major hint about sacred games 2 release date