रेश्मा राईकवार

बुलबुल

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन

दंतकथांचा भारतीय मनांवर खूप मोठा पगडा आहे. लहानपणीपासून ऐकलेल्या या दंतकथांमध्ये सत्याचा काही अंश असेल का? असा विचारही आपल्या मनात प्रत्येक वेळी डोकावून जातो. आणि दरवेळी आपणच निर्माण के लेल्या प्रश्नाला ठामपणे ‘नाही’ म्हणत पुन्हा तिला तिचे दंतकथेचे रूप बहाल करून आपण मोकळे होतो. मात्र ही दंतकथा खरोखरच जिवंत झाली तर.. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘बुलबुल’ चित्रपटात अशाच एका दंतकथेचे रुपक मांडत लेखक आणि दिग्दर्शक अन्विता दत्तने ‘स्त्री’ या लिंगाला वेटोळे घालून बसलेल्या अनेक वास्तवकथांचे पदर अगदी घट्ट गुंफले आहेत.

रुपक, अमानवी शक्तींचा थरार आणि फ्रे मभर पहिल्या क्षणापासूनच पसरलेला रक्तवर्णी निखार, त्यावर दिसणारी नाजूक चणीची कु रळ्या काळ्याभोर के सांची परीसारखी व्यक्तिरेखा.. हे सगळे काही तरी वेगळे आहे, याची जाणीव काही सेकं दांत आपल्याला होते. हा यातल्या ‘चुडैल’च्या दंतकथेचा प्रभाव आहे, पण दुसऱ्याच क्षणाला १८८१ सालच्या ब्रिटिशकालीन बंगालमधील एका गावात छोटीशी झाडावर चढून कै ऱ्या काढणारी उत्साही, बडबडी बुलबुल दिसते. कै री काढण्यात दंग असलेल्या छोटय़ा बुलबुलला उचलून तिची आई मांडवात आणते आणि तिच्यापेक्षा कित्येक वर्षांनी मोठय़ा  असलेल्या ठाकू र मोशायशी (राहुल बोस) तिचे लग्न होते. लग्न, नवरा, घर या सगळ्या संकल्पनांच्या परे असलेल्या बुलबुलची गाठ तिच्याचसारख्या चुणचुणीत मुलाशी सत्याशी पडते. सत्या तिला पहिल्यांदा चुडैलची गोष्ट सांगायला सुरुवात करतो. गोष्टींचा हाच धागा तिला पुढची वीस वर्षे त्या अनोळखी घरात सत्याशी जोडून ठेवतो. सत्याशी खेळत-बागडत मोठय़ा झालेल्या या सुंदर अशा नवयौवना ‘बडी बहू’ला अजूनही तो तिचा दीर आहे आणि तिचा नवरा कोणी तरी वेगळा आहे, या गोष्टी पचनी पडत नाहीत. चित्रपटातील हा कथेचा भाग आपल्याला सहजपणे रबींद्रनाथ टागोर आणि त्यांच्या ‘चोखेर बाली’पर्यंत आणून सोडतो. चारुलता आणि बुलबुल या दोघींच्या कथेत नाही म्हटले तरी साधर्म्य आहेच.. पण ते या दीर-भावजयीच्या गुंतागुंतीच्या नात्यापर्यंतच. सुंदर, हळव्या आणि अबोल अशा स्त्रीची बुद्धिमत्ता, तिच्या भावना आरस्पानी सौंदर्यातच अडकतात. सौंदर्याच्या आत दडलेले तिचे मन कोणालाच दिसत नाही, दिसतो तो फक्त स्त्री देह. एका क्षणाला अन्यायाची, वेदनेची परिसीमा तिला अंतर्बाह्य़ बदलून टाकते. अन्विताची नायिका बुलबुल आणि तिची गोष्ट इथून पुढे खूप वेगळी होते.

या चित्रपटाची कथा अत्यंत प्रभावीपणे लिहिली आहे. रात्रीच्या भयात अधिकच गोठवणारी चुम्डैलची दंतकथा आणि स्त्री लिंगाचे आजवर न बदललेले वास्तव या दोन्ही गोष्टी रुपकात सहजतेने गुंफण्याचे काम अन्विताने के ले आहे. मूळ कथा प्रभावी आहेच, त्याचे दिग्दर्शन करतानाही त्यातले सौंदर्य आणि वास्तव थेट तरीही कलात्मक पद्धतीने रंगवण्यातही दिग्दर्शक म्हणून अन्विता यशस्वी ठरली आहे. बुलबुलच्या व्यक्तिरेखेला एक धार आहे. ती के वळ सुंदर, कचकडय़ाची बाहुूली नाही. तिची एक ठाम विचारधारणा आहे, मते आहेत. हळवी बुलबुल आणि तिच्या भोवतालच्या माणसांचे खरे रूप काय याची जाणीव झाल्यावर बदललेली, तोंडावर छद्मी हास्य ठेवत मनात काय चालले आहे याचा थांगपत्ताही लागू न देता अधिक मोकळेपणाने वावरणारी तीच सुंदर बुलबुल या दोघी खूप वेगळ्या आहेत. लहानपणी मला दिसलेला तो माझा नवरा कु ठे आहे? हे  विचारण्याचे धाडस असलेली निरागसता तिच्याकडे आहे. तर त्या एकाच व्यक्तीशी आपण तेव्हापासून जोडलेलो आहोत हे सत्य उराशी कवटाळून बसलेली आणि तरीही सांगण्याचे धाडस नसलेली ती एक पत्नी आहे, सून आहे. हा विरोधाभास मान्य करूनही परिस्थितीशी जुळवून घेण्याएवढा वेळही समाज तिला देत नाही. ज्या चुडैलच्या कथा ऐकू न ही माणसे घाबरतात, प्रत्यक्षात त्यांच्यातली चुडैल वृत्ती अनेक निरागस स्त्री मनांना जिवंतपणी मारत राहाते, हे असे अनेक कं गोरे  कथेच्या ओघात दिग्दर्शकाने मांडले आहेत. इतकी प्रभावी कथा त्रिप्ती डिमरी, राहुल बोस, परमब्रता चट्टोपाध्याय, पाओली डॅम या कलाकारांनी आपल्या अभिनयाने अधिक जिवंत के ली आहे. बंगाली पार्श्वभूमीवर रंगवलेल्या या कथेत काही खटकणाऱ्या गोष्टी असल्या तरी त्या किरकोळ म्हणता येतील अशा आहेत. रुपकाच्या आधारेही नव्याने काही सांगण्याची, समाजाला आरसा दाखवण्याची ताकद सिनेमा या माध्यमात आहे हे या चित्रपटाने पुन्हा एकदा जाणवून दिले आहे.

’ दिग्दर्शक – अन्विता दत्त

’ कलाकार – त्रिप्ती डिमरी, राहुल बोस, अविनाश तिवारी, परमब्रता चट्टोपाध्याय, पाओली डॅम.