31 October 2020

News Flash

‘सेक्रेड गेम्स’ला फटका; वेब सीरिजचे नवीन भाग प्रदर्शित होणार नाहीत

या वेब सीरिजमधील आक्षेपार्ह संवादासाठी अभिनेत्यांना जबाबदार ठरवता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

'सेक्रेड गेम्स'

Netflix ‘Sacred Games’ case: नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी आज (सोमवार) पार पडली. या वेब सीरिजचे आठ भाग प्रदर्शित झाल्याने त्यावर काहीच करू शकत नाही असं म्हणत कोणतेही नवीन भाग प्रदर्शित करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे या वेब सीरिजमधील आक्षेपार्ह संवादासाठी अभिनेत्यांना जबाबदार ठरवता येणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

‘सेक्रेड गेम्स’च्या काही दृश्यांत माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आशय आहे, त्यामुळे ते काढून टाकावेत अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. यातील काही दृश्ये व संवाद आक्षेपार्ह असून त्यात दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांची बदनामी झाली आहे, असा आरोप याचिकेत केला आहे.

‘दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची ‘सेक्रेड गेम्स’ मालिकेत बदनामी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारास अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, नेटफ्लिक्स व सेक्रेड गेम्सचे निर्माते जबाबदार आहेत,’ असं काँग्रेस कार्यकर्ते राजीव सिन्हा यांनी तक्रारीत म्हटलं होतं. या याचिकेवरील पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 11:46 am

Web Title: netflix sacred games case delhi high court says nothing new will be aired
Next Stories
1 ठाकुरांच्या नाकावर टिच्चून दलित वराची शाही वरात
2 हुंड्यासाठी छळ?, एअर होस्टेसची चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
3 सामूहिक बलात्कारानंतर महिलेला मंदिराच्या आवारात जिवंत जाळले
Just Now!
X