अभिनेत्री सोनम कपूर अहुजा आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुले कायम चर्चेत असते. तिच्या फॅशन सेन्समुळे ती कायमच नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सोनम कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे नव्हे तर कॉमन सेन्समुळे सोनम चर्चेत आली आहे. तिच्या एका पोस्टमुळे तिला चांगलंच ट्रोल केलं जातंय.

नुकतंच सोनमने आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर करोना लसीकरणासंदर्भात एक पोस्ट केली आहे. यात ती विचारत आहे की तिचे आजी आजोबा आणि घरच्यांना करोनाची लस कशी मिळेल. खरंतर तिने माहिती मिळवण्यासाठी केलेली ही पोस्ट आता तिच्या अंगलट आलीये.
“आपले आईबाबा, आजी आजोबा यांना भारतात करोना प्रतिबंधक लस कुठे मिळेल? मी खूप गोंधळले आहे कारण प्रत्येक बाजूने वेगळी माहिती मिळत आहे. पण मला खरंच याच्याबद्दल माहिती हवी आहे”, अशा आशयाचं ट्वीट तिनं केलं आहे. आता खरंतर यात ट्रोल करण्यासारखं काहीच नाही. पण तरीही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

तिच्या या प्रश्नावर काहींनी तिला ‘गुगल’ करण्याचा सल्ला दिला आहे, तर काहीजण तिला ‘बातम्या’ बघण्याचा सल्ला देत आहेत. काहींनी तर सरळ आदर पुनावालाला विचार असा उपरोधिक सल्ला तिला दिला आहे.

सोनमने२०१८ साली आनंद आहुजाशी लग्न केलं आहे. तेव्हापासून ती कधी भारतात तर कधी लंडनमध्ये असते.