News Flash

रामायणात लक्ष्मण साकारणाऱ्या सुनील लहरींचा मुलगा बनला ‘नॅशनल क्रश’

पाहा क्रिश लहरीचे फोटो..

अभिनेते सुनील लहरी व त्यांचा मुलगा क्रिश लहरी (छायाचित्र सौजन्य : सोशल मीडिया)

लॉकडाउनमध्ये ‘रामायण’ ही पौराणिक मालिका पुन्हा सुरू झाल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. त्यातील कलाकार आता काय करतात, आता कसे दिसतात, त्यांचे कुटुंबीय याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी त्यातील कलाकारसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे किस्से, तेव्हाचा अनुभव अशा बऱ्याच गोष्टी या कलाकारांनी आतापर्यंत प्रेक्षकांना सांगितल्या. या कलाकारांचे बरेच फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांच्या मुलाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सुनील लहरी यांच्या एक फॅन क्लब पेजवर त्यांच्या मुलाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. क्रिश लहरीचा फोटो पोस्ट करत त्याला ‘नॅशनल क्रश’ म्हटलंय. ‘रामायण’ पुन्हा सुरू झालं तेव्हापासून सुनील लहरी यांचेसुद्धा तरुणपणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सुनील लहरी यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतच नव्हे तर ‘विक्रम वेताळ’ या मालिकेत देखील काम केले आहे. १९९० रोजी ‘परम वीर चक्र’मध्ये काम केले होते. त्याआधी त्यांनी १९८० मध्ये ‘द नेक्सेलाइट्स’ या चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत भूमिका साकारली होती. सुनील यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

लॉकडाउनमध्ये ‘रामायण’ ही मालिका सर्वाधिक पाहिली गेली. अनेक वर्षांनंतर आजही या मालिकेची लोकप्रियता कायम असल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 5:50 pm

Web Title: netizens swoon over sunil lahri son handsomeness calls him national crush ssv 92
Next Stories
1 १५ दिवसांत करोनाने घेतला पाचव्या संगीतकाराचा बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू
2 “कतरिनाने माझ्याकडे येउन सलमानची तक्रार केली होती”; शोएब अख्तरचा दावा
3 Video : ‘पल में रुला दिया’; इरफान खानच्या आठवणीत दीपिका भावूक
Just Now!
X