News Flash

शनायासाठी काय पण, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

हा चित्रपट १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रसिका सुनील

झी मराठी या वाहिनीवरील ‘माझ्या नवराच्या बायको’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनीलने ही मालिका सोडून आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र तिच्या लोकप्रियतेमध्ये तसूभरही कमी झाली नाही. त्यामुळे ती जिथे जाईल तिथे तिचे चाहते तिला भेटण्यासाठी हजर असतात. असाच अनुभव नुकताच ‘गॅटमॅट’ या चित्रपटाच्या सेटवर पाहायला मिळाला आहे.

निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित आगामी ‘गॅटमॅट’ चित्रपटामध्ये रसिका सुनील झळकणार असून या चित्रपटाच्या सेटवर तिचे चाहते तिला भेटण्यासाठी प्रयत्न करत होते. या साऱ्यामध्ये चित्रपटाच्या संपूर्ण टीमला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं.

रसिकाच्या काही चाहत्यांनी तिला भेटण्यासाठी सेटवर बांधण्यात आलेली उंच सुरक्षाभिंतदेखील ओलांडून येण्याचा प्रयत्न केला. इतकच नाही तर रसिकाला भेटणं अशक्य झाल्यामुळे काही चाहत्यांनी मोबाईलवरून तिचे गुपचूप फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या प्रकारामुळे चित्रीकरणामध्ये व्यत्यय येऊन अनेक वेळा सेटवरील काम खोळंबल्याचं दिसून आलं.

दरम्यान, यशराज इंडस्ट्रीजच्या सहयोगाने अवधूत गुप्ते यांची प्रस्तुती असलेल्या ‘गॅटमॅट’ हा चित्रपट १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक रोमॅण्टिक चित्रपट असल्याच सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 3:23 pm

Web Title: new marathi movie gatmat rasika sunil
Next Stories
1 हा सुपरस्टार साकारणार अंतराळवीर राकेश शर्माची भूमिका
2 ‘CID’ मालिका घेणार क्षणभर विश्रांती
3 ‘तानाजी’ चित्रपटात काजोल साकारणार महत्त्वाची भूमिका
Just Now!
X