आपलं नशीब ही सटवाई लिहून जाते असं गेल्या अनेक पिढ्यांपासून आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ही सटवाई नेमकी कशी असते हे कोणीच अचूक शब्दात सांगू शकत नाही. त्यामुळेच या विषयावर भाष्य करणारा सटवाई हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आतापर्यत कलाविश्वात अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली असून नवनवीन विषय हाताळल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या

चित्रपटाच्या माध्यमातूनदेखील एक नवीन विषयावर प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. ‘जगातील सर्वात सुंदर स्त्री’, अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. दिनेश शिरोडे दिग्दर्शित ‘सटवाई’ या चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरु असून अलिकडेच या चित्रपटाचं टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. हा चित्रपट २०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

How to pick the best AC types cooling capacities BEE star ratings and more you know while purchasing AC
थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत
Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
bhakri stomach health marathi news, chapati stomach health marathi news
Health Special: भाकरी, पोळी की चपाती – पोटासाठी काय चांगले?
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन

दरम्यान, सध्या या चित्रपटाविषयी अन्य कोणत्याही गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला नाही. तसंच या चित्रपटात नेमके कोणते कलाकार स्क्रीन शेअर करणार हेदेखील गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.