X
X

‘विठ्ठल’ मध्ये झळकणार श्रेयस तळपदे ?

READ IN APP

या चित्रपटामध्ये श्रेयस नक्की कोणती भूमिका वठविणार हे स्पष्ट झालं नाही.

महाराष्ट्रचे आराध्यदैवत आणि अखंड वारकरी समुदायाच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित ‘ विठ्ठल ‘ या चित्रपटाची चर्चा सवर्त्र जोरदार सुरु आहे. कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा असणाऱ्या माउलीचे मनुष्य रूप दाखवणाऱ्या या चित्रपटाचा सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच टीझर प्रदर्शित करण्यात आला. राजीव रुईया यांची कथा असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता श्रेयस तळपदे झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सुरुवातीला विठ्ठलाची भव्यदिव्य मूर्ती दिसत असून ढोल ताशाच्या गजरात माऊलीचं नमन करण्यात येत आहे. यावेळी श्रेयस दिसत असून तो माऊलीला वंदन करत आहे. मात्र या चित्रपटामध्ये श्रेयस नक्की कोणती भूमिका वठविणार हे स्पष्ट झालं नाही.

आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. ‘विठ्ठल’ नामाचा गजर करणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी केली आहे. तर ‘विठ्ठल’ची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप दंडवते यांनी संवादलेखन केले आहे.

दरम्यान, या चित्रपटात अभिनेता सचित पाटील विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जोडीला हर्षदा विजय ही नवोदित अभिनेत्रीदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे , तसेच अशोक समर्थ, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे.

22
X