21 September 2020

News Flash

स्टार प्रवाहवर ‘दुहेरी’ थ्रीलर सस्पेन्स!

मैथिली आणि नेहा या दोन बहिणींची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे.

’ उद्यापासून नवी मालिका
’ रवींद्र महाजनी पुन्हा छोटय़ा पडद्यावर
यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय जाधव ‘दिल दोस्ती दुनियादारी’ नंतर आता ‘दुहेरी’ ही नवी मालिका घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरु होणारी ‘दुहेरी’ ही नवी मालिका थ्रीलर सस्पेन्स आहे.
मैथिली आणि नेहा या दोन बहिणींची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे. नेहाच्या रक्षणासाठी मैथिलीला स्वत:ला बदलावे लागते. दोघी बहिणींच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे नाटय़ मालिकेत सादर करण्यात आले आहे. मैथिली आणि नेहा या दोन भूमिका अनुक्रमे उर्मिला निंबाळकर व अमृता पवार करत आहेत. अभिनेते सुनाल तावडे हे ‘परसू’च्या भूमिकेद्वारे खलनायक सादर करत असून मालिकेत निवेदिता सराफ, तुषार दळवी, रवींद्र महाजनी आदी कलाकार आहेत.
सोमवार ३० मे पासून ‘दुहेरी’ स्टार प्रवाहवरुन सुरु होत असून सोमवार ते शनिवार दररोज रात्री साडेआठ वाजता मालिकेचे प्रसारण होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:01 am

Web Title: new suspense thriller serial on star pravah
टॅग Star Pravah
Next Stories
1 ‘सैराट’ मराठा समाजाची लायकी काढणारा चित्रपट- नितेश राणे
2 शाहरुखच्या अबरामचे ३० हजार फूट उंचीवर ‘बर्थ डे सेलिब्रेशन’!
3 ‘युतिका’मुळे ‘युथ’ स्पेशल- नेहा महाजन
Just Now!
X